हुंकार- व पू काळे

हुंकार- व पू काळे

वपूंचा हुंकार हा कथासंग्रह म्हणजे तरुण्यातील बेरीज वजबकीच आलेखाच!
तारुण्य - आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ.
प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वतःची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसऱ्याची गंमत मजेत दरून
बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. नकळत खालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जागतात, काही जण त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात.
प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या साऱ्या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चित्तारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुद्कन हसवणाऱ्या, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणाऱ्या, तर कधी सरळ सत्याला भिडणाऱ्या अशा या कथा आहेत.

या संग्रहातील कथा

* हुंकार
* चक्रम
* फिरते पंखे
* मांजर
* कैफ
* शिकार
* पोरकी
* सोनाराने कान टोचले दुसऱ्यांदा
* त्याचा येळकोट राहीना
* बुमरँग
* निर्णय
* पहारा
* कैफियत
* हॉलिडे स्पेशल
* रिकामी खुर्ची
* अगा जे घटलेची नाही
* तक्षक
आभार : विकीपिडीया

0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author