वपूंशी संवाद....


  • प्रिय वपु
    सप्रेम नमस्कार

    पञास कारण की, आज तुमचा जन्मदिवस,,,सो म्हटल तुमच्याशी 'संवाद साधावा.
    साहित्य म्हटल की त्यात कल्पनाविलास आला, एखादी छोटी गोष्ट रंगवून सांगण आल. पण तुमच्या कथांमध्ये मला वेगळेपण जाणवल.
    तुमच्या कथा जिवंत माणसांच्या, माणसांच्या नातेसंबंधांबद्दल...स्वैर वेड्या मनाचे विविध कांगोरे..अचुक टिपलेयत तुम्ही...एकाद्या चिञकारासारख.

    पुस्तक वाचुन झाल कि अन वाचता वाचता विचार करायला मन प्रवृत्त होत.. अन सगळ्यात महत्वाच म्ह्णजे मनाला तंतोतंत भिडणार्या, पटणार्या..कथा. वाचताना जे घडतय ते अशक्य आहे अस वाटतच नाही.. कस जमल तुम्हाला हे माणसांना हुबेहुब वाचण? मनाने हळवे होतात म्हणून? हळव्या माणसांना खुप सोसाव लागत ना, ईतरांना सुखी करण्यासाठी..तुम्हीही सोसलात..अन वाचकांना तुमच्या विचारांनी समृद्ध केलत..

    College life पर्यंत तरी कधी तुमच पुस्तक हातात पडलच नाही..अन मी तुम्हाला ओळखतही नव्हतो. ईथेच 'वपुर्झा' ग्राफिटी वाचली अन कुतूहल वाढल..मग तुम्हाला वाचायला घेतल अन पहिल्याच भेटीत तुम्हा आवडलात. ''श्री पार्टनर, ठिकरी, संवाद, हि वाट एकटिची, वपुर्झा, प्लेझर बाँक्स''..मिळतील तितकी बुक झपाट्याने वाचली. अन याच झपाटलेपणात एकदा तुमच्या पेज Admin ना मेसेज टाकला..
    ''मला वपुंशी बोलायला मिळेल'' नम्रपणे उत्तर आल..
    ''ते आता विश्रांती घेतायत बोलण होऊ शकत नाही''
    किती मुर्ख होतो मी. याची मला नंतर जाणीव झाली.  तुमची दोन तीन पुस्तक वाचुन झालेली तरी तुमची जन्मतारीख एकदाही चेक केली नाही... तुम्ही ईथे नसतानाही.. तुमच पुस्तक वाचुन पटकन तुमच्याशी ''संवाद'' करावा वाटला. हेच अपेक्षित होत ना तुम्हाला सगळ्यांकडून..?
    ''संवाद''.
    पण हल्ली संपत चाल्लाय हो हा..''संवाद''
    माणस 'वाद' आवडीने घालतात.. पाठीमागे बोलतात.. जमल तर तोंडावर भांडतात. Technology ने आम्ही एका बोटाईतक जवळ आलोय खर पण Emotionally आम्ही खुप दूर चाल्लोय. 'संवाद' हरवलाय.

    असो.. तुम्ही आता आसपास नाही आहात पण तुमच अस्तित्व जाणवत मला..तुमच्या पुस्तंकातून, तुम्ही बोलता माझ्याशी..आपला संवाद होतो..
    ''वपुर्झा'' हे एक औषध झालय माझ्या मनासाठी..

    आपलाच
    - मनु (
    Manoj Dasuri)

    https://www.facebook.com/mdasuri


0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author