वपुंच्या वाढदिवसानिमित्त...


वपुंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी खास...

Title-
अशीही एक आठवण...

एका मैत्रीणीच्या सांगण्यावरुन माझी आणि वपुंची ओळख झाली. पुस्तकरुपानेच ती... तसे वपु मला अपरिचीत नव्हतेच.पण खूप असा परिचय ही नव्हता.फक्त एक प्रसिद्ध लेखक एव्हढीच काय ती कल्पना. त्यांची 2-3 कथानक मी ऐकली होती. Audio Clips वरच. सगळ्यात आवडला तो त्यांचा आवाज,सांगण्याची ढब. एक निराळीच शैली, निराळ्याच माणसाची.. अमिताभ बच्चन च्या आवाजाचे लोकं 
fan
आहेत. मी ही आहे. जसा त्यांचा तसा वपुंच्या आवाजाचा.अमिताभजींच्या आवाजात एक दरारा दिसतो. वपुंच्या आवाजात एक आपलेपणा.. फरक काय तो हाच.. मला जाणवलेला.... वपुंचे पार्टनर,वपुर्झा,दोस्त ही 2-3 पुस्तके मला वपुमय करण्यासाठी पुरेशी होती. मला त्यांची चाललेली लेखणी आवडली.भावली. त्यांच्या अनेक कथांनी खूप हसवल. कधी त्या मनाला हळव असल्याची चाहुलही दिली..आणि कधी दिलखुलास एक नवा दोस्त आयुष्याच्या दोर्यात विणला जावा असा दोस्तही बनवल... सहवास न लाभता,प्रत्यक्ष न भेटता त्यांनी माझ्यासारख्या अगणित लोकांना आपलस केलय.पत्ररुपानेही मने जुळ्तात हे त्यांनी सिद्ध केल. कुठलाही प्रसंग वाचताना त्याची मनात एक प्रतिमा तयार होते. माझ्यातरी.. कुठल्याही लेखकाला तेच मोठ पारितोषिक असेल..आणि वपुंकडे तर अशा पारितोषिकांची खाणच मिळेल..

माझ्यासाठी तरी तुम्ही खूप काही दिलय वपु..खरच तुम्हाला भेटण्याची इच्छा वारंवार होतेय.तुम्ही तुमच्या अनुभवातुन सांगतानाचा काळ आज माझ्यासमोर उभारतोय.मला खूप लिहावस वाटतय तुमच्यासाठी.. तुमच्यावर..पण शब्द मलाच नाही सुचत.काय करू...??
You are great
वपु... yess you are... कारण आजही तुम्ही आहात. माझ्यासोबत तरी.. त्या पुस्तकांमधूनच सही एक सच्चा दोस्त कमावल्याच सुख आहे...जन्मभराचच...

अशीच एक तुमची आठवण तुमच्यासाठी खास..
By-मकरंद आयचित

0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author