भूक - व पू काळे Va Pu kale


आकाशाकडे  सगळेच  बघतात  पण  त्रयस्थासारखे. म्हणूनच ते  जरा भरून  आलं  किंवा विजेचा  लोळ  कोसळताना  दिसला कि  माणस  पळत सुटतात. आकाशाकडे  पाहायचं ते आकाश  होवून  पाहावं  म्हणजे  ते जवळच वाटतं, ''विराट" ह्या  शब्दाचा तेंव्हा  समजतो. अमर्याद  शब्द  पारखायचा  असेल  तर  समुद्र  पाहावा , विविधता  शब्द  समजून  घ्यायचा असेल  तर  माणूस पाहावा,  पण  तोही  कसा ? तर  आतून  आतून पाहावा. मग माणसांची भीती उरत नाही. अगदी हलकटातला हलकट माणूसदेखील हलकट  म्हणून  आवडतो .

जीवनावर , जगावर , जगण्यावर  असं  प्रेम  केलं  म्हणजे  सगळं  निर्भय होतं. उपमा  द्यायचीच  झाली  तर  मी  विजेचीच  उपमा  देईन. पृथ्वीची ओढ  निर्माण  झाली  रे  झाली  कि  ती आकाशाचा  त्याग  करते, पृथ्वीवर दगड  होवून  पडते, पण  पडण्यापासून  स्वताला  सावरत  नाही  आणि तेजाचाही  त्याग  करत  नाही. प्रेम  करताना  माणसानंही  असं  तुटून  प्रेम करावं. डोळे  गेले तरीही  चालतील  पण  नजर  शाबूत  हवी. स्वर  नाही सापडला  तर नाही  पण  नाद  विसरणार  नाही . पाय  थकले  तरी  बेहत्तर पण  गती  ची  ओढ टिकवून धरीन. ही  भूक  कायम  असली  कि  झालं  !

आयुष्यात  ही  भूक  जिवंत  ठेवावी  आणि  निर्भयतेने  पुरी  करीत  राहावं.

0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author